*मोकाशी कॉलेजमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिवस लक्षणीय उपक्रमांनी साजरा करण्यात आल*
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये सर्व घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजित मोकाशी साहेब, संचालक श्री. विलास चौधरी सर, सनदी लेखापाल श्री. दीपक कदम साहेब हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते; त्याचबरोबर सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. के. एस. घुटुकडे, डॉ. पी. पी. पाटील, डॉ. एस. एस. भूतकर, प्रा. एस. इ. जगताप, प्रा. डी. एस. सुर्यवंशी, प्रा. सुजाता पवार मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उस्फुर्त सहभागाणे व आयोजित कार्यक्रमातर्गत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, ध्वजाला मानवंदना, राष्ट्रगीत, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विध्यार्थिनींनी गायलेले झेंडा गीत, तृतीय वर्ष कृषिच्या विध्यार्थिनींनी गायलेले समूह गीत, द्वितीय वर्ष कृषिच्या विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे दिलेली ध्वजवंदना, कुमारी. प्रियांका चव्हाण, कुमारी. मोनिका लावंड, कुमारी. अश्विनी ओहोळ, कु. सिद्देश पाटील, कुमारी. मृणाल कांबळे या घटक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता दिवस यावर सादर केलेले प्रेरणादायी मनोगत यासारख्या लक्षणीय कार्यक्रमांनी दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमारी. सिद्धी गायकवाड व कुमारी. सानिका पाटील यांनी केले.











