Home
शैक्षणिक सहल -२०२४-२०२५
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील प्रथम वर्ष द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची EDNT-121 (०+१=१) या कोर्सची शैक्षणिक सहल आज गुरुवार २६ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली; रायगड, खादी व ग्रामोद्योग, मधुमक्षिकापालन/ रस्ट संशोधन केंद्र/ मॅप्रो गार्डन/ कृष्णा नदी उगमस्थान/ शिवमंदिर; वाई गणपती अशी आयोजित असून यासाठी संचालक श्री विलास चौधरी यांच्या प्रोत्साहनाने, प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, टूर प्रमुख प्रा. व्ही. टी. बागल यांच्या व्यवस्थापनाने, टूर समन्वयक प्रा. व्ही. व्ही. माने, प्रा. ए. व्ही. माने यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
दरवर्षीप्रमाणे श्री गणरायांचे थाटामाटात आगमन
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान मध्ये दरवर्षीप्रमाणे श्री गणरायांचे थाटामाटात आगमन .संस्थेचे संचालक श्री विलास चौधरी सर यांच्या उपस्थितीत गणरायाचे आगमन व प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या जलोशात साजरी करण्यात आली.
चचेगाव शाळा परिसरात कृषिदूतांकडून वृक्षारोपण
दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, राजमाची मध्ये लँड मॅनेजमेंट विषयावरती सेमिनार
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयामध्ये मंगळवार दिनांक २८ मे, २०२४ रोजी चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी श्री हरीश कुलकर्णी यांनी लँड मॅनेजमेंट या विषयावरती मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कृषि संलग्न क्षेत्रातील संधी याबद्दल जाणीव निर्माण करत असताना प्रचलित अभ्यास क्रमानुसार लँड मॅनेजमेंट हे क्षेत्र भविष्यात सर्वोत्कृष्ट संधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी पदवीनंतर उपलब्ध संधी यासाठी संस्थेचे सचिव श्री अभिजित मोकाशी साहेब, डॉ. विश्वजित मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी व प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे यांच्या प्रयत्नातून सेमिनार संपन्न झाला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
मोकाशी कृषि महाविद्यालयामध्ये AgroStar कंपनीमध्ये कृषी सल्लागार पदासाठी मुलाखत
दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची शैक्षणिक संकुलामध्ये शनिवार दिनांक 20 एप्रिल, 2024 रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू इच्छूक विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10.00 वाजता आयोजित केले होते. कॅम्पस ड्राईव्ह रिक्रुटमेन्ट कार्यक्रमासाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे संचालक श्री विलास चौधरी, ऍग्रो स्टार चे व्यवस्थापक श्री संदीप बोरमाळे, तांत्रिक तज्ञ निकिता यादव, सहाय्यक व्यवस्थापक श्री अमोल अहेर, टीम लीडर अश्विनी चीखले, पीपल प्रॅक्टिस टीम अनंत मगर, प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे, प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. पी. पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सर्वात फोटो पूजन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार, ऍग्रो स्टार चे ओरिएंटेशन करून प्रत्यक्ष मुलाखत सुरू केली यावेळी एकूण ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. विद्यार्थ्यांच्या कृषि क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट करिअर साठी संस्थेचे सचिव श्री अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ विश्वजीत मोकाशी यांच्या प्रेरणेतून विविध नामांकित संस्थांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभते.
Campus Drive- Recruitment Programme @ Agri Advisor in Agro Star
Dadasaheb Mokashi College of Agriculture
AGRICULTURE is back bone of Indian economy. Agriculture increases the country’s Food security. It reduces food import. Agriculture can also be a source of income by exporting agriculture products. Agriculture is also important for much reason, the most important of which is that we all need to eat. Agriculture allow us to find quicker and faster ways to grow food, it allows us to better the content of our food that we grow i.e. Value addition. Only by studying and experimenting with agriculture we can better suit our needs.
Opportunities:
- Agriculture Officer in State Govt.
- Agriculture Officer / Technical Officer,in various Banks.
- Agriculture Input Service center (Krishi seva Kendra, Agri Clinic etc.)
- Production Officer In many Seed, Fertilizer, Pesticide, manufacturing Industries.
- One can establish His/her Own Soil Testing Lab.
- As a scientist in Agriculture Research Centers Run By Central & State Government.
- Can achieve higher government posts through competitive exams like MPSC, UPSC etc.
- Agriculture reporter in different news channels.
- Higher education in M.Sc., M.B.A., ABM, Ph.D. at various Reputed Organization in India and abroad.
- Agriculture officer in military farms & various sugar industries.
“बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” – दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक अभिमानाचा तुरा
मुंबई: शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, रस्ते व महामार्ग मंत्री भारत सरकार श्री. नितीनजी गडकरी, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री भारत सरकार श्री. रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. राहुल नार्वेकर, राज्य शिक्षण मंत्री भारत सरकार डॉ. सुभाष सरकार, राज्य कायदा व न्यायमंत्री भारत सरकार प्रा. एस. पी. सिंग बागेल, भारतीय फिल्म अभिनेत्री व माझी संसद सदस्य श्रीमती जया प्रदा यांची प्रमुख उपस्थिती होती.
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये विविध घटक महाविद्यालया मार्फत विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
शुक्रवार दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२२ रोजी ट्रायडेंट हॉटेल, मुंबई याठिकाणी एशिया टुडे रिसर्च व मीडिया यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या एज्युकेशन प्राईड समित अँड अवार्ड – २०२२ (शिक्षण अभिमान आणि शिखर पुरस्कार-२०२२) यामध्ये वैयक्तिक व संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक श्री विलास चौधरी उपस्थित होते.
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या भरीव योगदाना बद्दल सर्व घटक महाविद्यालयातील प्राचार्य प्रा. ए. एस. ढाने ,डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी. पी. पाटील,प्रा. एस. ई. जगताप, प्रा. पवार एस.एम., प्रा. डी. एस. सूर्यवंशी, व प्रा. एस. एन. सूर्यवंशी व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.
दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालयातील पशुसंवर्धन फॉर्म वरती फ्रिझवाल जातीची उत्पत्ती
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, राजमाची येथील *पशूशास्त्र व दुग्धशास्त्र* विभागातील पशुसंवर्धन फार्म वरती संशोधन आधारित विविध जातींची उत्पत्ती केली जाते ज्यामध्ये एम. पी. के. व्हि. राहुरी विद्यापीठाच्या जर्सी (२५%), एच. फ (५०%) व गिर (३५%) जातीपासून *"फुले त्रिवेणी"* त्याचबरोबर *राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल* येथील एच. फ. (५/८), सहिवाल (३/८) यांच्या आनुवंशिक गुणधर्मापासून निर्माण केलेल्या *"फ्रिझवाल"* या जातींची उत्पत्ती सहाय्यक प्राध्यापक *डॉ. एस. एस. भुतकर* व *प्रा. एम. बी. दुर्गावळे* यांच्या नियोजनाखाली शैक्षणिक संकुलाच्या पशुसंवर्धन फार्म वरती संशोधन आधारित नवीन जाती निर्माण केल्या जातात. मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलातील पशुसंवर्धन फार्म वरती संशोधन, शिक्षण व विस्तार यास संस्थेचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी यांच्या प्रोत्साहनामुळे तसेच प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जातात. संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी अश्या नवीन साशोधन आधारित माहितीसाठी तत्पर असतात.