“बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” – दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात आणखी एक अभिमानाचा तुरा

October 18, 2022 0 Comments

मुंबई: शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल  दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगत सिंग कोश्यारीजी यांच्या हस्ते मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री. अभिजीत मोकाशी व उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, रस्ते व महामार्ग मंत्री भारत सरकार श्री. नितीनजी गडकरी, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री भारत सरकार श्री. रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. राहुल नार्वेकर, राज्य शिक्षण मंत्री भारत सरकार डॉ. सुभाष सरकार, राज्य कायदा व न्यायमंत्री भारत सरकार प्रा. एस. पी. सिंग बागेल, भारतीय फिल्म अभिनेत्री व माझी संसद सदस्य श्रीमती जया प्रदा यांची प्रमुख उपस्थिती होती.
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये विविध घटक महाविद्यालया मार्फत विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
शुक्रवार दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२२ रोजी ट्रायडेंट हॉटेल, मुंबई याठिकाणी एशिया टुडे रिसर्च व मीडिया यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या एज्युकेशन प्राईड समित अँड अवार्ड – २०२२ (शिक्षण अभिमान आणि शिखर पुरस्कार-२०२२) यामध्ये वैयक्तिक व संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट सेवा व योगदाना बद्दल  दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची “बेस्ट एग्रीकल्चर कॉलेज इन महाराष्ट्र” साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 यावेळी संस्थेचे संचालक श्री विलास चौधरी उपस्थित होते.  
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलाच्या भरीव योगदाना बद्दल सर्व घटक महाविद्यालयातील प्राचार्य प्रा. ए. एस. ढाने ,डॉ. एस. एम. शिंदे, डॉ. पी. पी. पाटील,प्रा. एस. ई. जगताप, प्रा. पवार एस.एम., प्रा. डी. एस. सूर्यवंशी, व प्रा. एस. एन. सूर्यवंशी व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.