दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न ११ जानेवारी २०२३
January 16, 2023
0 Comments
Tour Information
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची *कोर्स नंबर EDNT- 242 एज्युकेशनल टूर* अंतर्गत दक्षिण भारतातील तेलंगणा राज्याची राजधानी व दख्खन पठारावरील साहित्यिक शहर हैदराबाद या ठिकाणी बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ते रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 या चार दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले होती यामध्ये 34 मुली व 74 मुले यांनी सहभाग नोंदवला.
या सहली दरम्यान समृद्ध शिक्षण व संशोधन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा असलेल्या हैदराबाद शहरातील प्रसिद्ध *गोलकोंडा किल्ला* या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगचा अनुभव घेतला त्याचबरोबर विविध रंगांची फुले, झाडे व झुडपे असणाऱ्या *एनटीआर गार्डन* या 36 एकर क्षेत्रावरती पसरलेल्या आकर्षक स्थळास भेट दिली आधुनिक शैलीचे शहरी उद्यान *लुबिनी पार्क* मधील नेत्र दीपक लाईट वर साऊंड असून भगवान बुद्धाला समर्पित उद्यान त्याचबरोबर हैदराबादच्या वैभवात ऐतिहासिक महत्त्व असलेली वास्तू *चारमिनार* हुसेन सागर लेक च्या बाजूला उंच टेकडीवरील पांढऱ्या शुभ्र संगमरवरी बांधकामात नक्षीकाम केलेले *भगवान वेंकटेश्वरांचे बिर्ला मंदिर* जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मितीचा 1500 एकर परिसरातील विलोभनीय पर्यटन व मनोरंजन स्थळ *रामोजी फिल्म सिटी* की जो फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स गिनीज बुक मध्ये नोंद आहे याचबरोबर *भारतीय कृषी अनुसंधान परिषद* स्थापित विस्तार शिक्षण संस्था (EEI), भात संशोधन संस्था (RRI), भारतीय अन्नधान्य संशोधन संस्था (IIMR) यास अभ्यासपूर्ण भेट दिल्या.
याप्रसंगी मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री अभिजीत मोकाशी उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी सर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले या शैक्षणिक सहलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांचे मार्गदर्शन त्याचबरोबर प्रा. बी.बी. चव्हाण प्रा. व्हि.पी. गवळी व प्रा. वाय. सी. माने यांच्या सहकार्याने नोंदणीकृत विद्यार्थ्यानी अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.