दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल गुरुवार दिनांक 13ऑक्टोबर, 2022 ते शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये EDNT-121- Educational Tour या कोर्स अंतर्गत रत्नागिरी, गणपतीपुळे, दापोली व रायगड याठिकाणी आयोजित केली होती. या अभ्यास भेटी अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र भाट्ये, देवदर्शन गणपतीपुळे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, नर्सरी, लाखी बाग, रबर लागवड व प्रक्रिया, कृषि माहिती व तंत्रज्ञान केंद्र, रायगड ट्रेकिंग अश्या विविध विभागांना भेटी देऊन माहिती घेण्यात आली. यासाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान चे सचिव श्री अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब, संचालक श्री विलास चौधरी साहेब यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. आर. एस. जाधव, प्रा. एस. एन. मोरे, प्रा. वाय. सी. माने, प्रा. एस. ए. इंगवले यांच्या सहकार्याने तीन दिवसीय शैक्षणीक सहल यशस्वी झाली.